काळीज चिरून जातं
काळीज चिरून जातं
बघू नको ग असं
काळीज चिरून जातं
तुझ्याच विचारात नंतर
अलगद विरून जातं || 0 ||
भाव तुझ्या डोळ्यातले
नक्कीच कळतात मला
गुपितार्थ कळतो
तुझ्या नजरेच्या इशाऱ्यातला
तुझ्याच स्वप्नांच्या कुशीत
अलगद शिरून जातं
तुझ्याच विचारात नंतर
अलगद विरून जातं || 1 ||