काळाने शिकवलं..
काळाने शिकवलं..
काळाने शिकवलं खर
कुठली गोष्ट स्वतः ची म्हणावी
कुठली गोष्ट मनाशी बाळगावी
काळाने आज शिकवले खरे
भविष्याची तजविज ही ठेवावी
कालचीच होती ती सोन पाखरे
पंख तयांचे गळुनी का पडले
प्रलया च्या या आवतारा पुढे
जिव कोमल कोमेजुनी गेले
जिवापाड जपल्या त्या भिंती
सारे कुटूंब नाहीसे का जाहाले
भाव म्हणून प्रश्न बाकी उरले
जीवनाने आज मरण दिले
कशा कशाची गरज नसते
क्षणात मातीमोल होते
सारे जरतारी स्वप्न आहे
उराशी सत्यात काही साकारेल का रे
काळाने शिकवले आज खरे
जिव जाता इच्छा ही मरावी ...
तरी राखेतुनी अन्कुरीत व्हावे
असे तजविज करुनी ठेवावी
