काळ
काळ
काळ चक्र फिरते
घेऊन लेखा जोखा
आजीवन पाप पुण्याचा
कर्म सदा आपले पारखा
देव आहे न्यायाचा
भेदभाव ना भक्तात
शमवा अहंकाराला
त्याग अज्ञानाचा जीवनात
क्षणा क्षणाला मुकते
आयुष्य आनंदी समयाला
कवटाळून का बसते मन
दुःखी, कष्टी भूतकाळाला
कहर कोरोनाचा जीवघेणा
सुरु झालेय मृत्यूतांड्व
घरीच थांबून करू बचाव
उपाय उरला आता एकमेव