STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

3  

Savita Kale

Tragedy

काहूर

काहूर

1 min
353

काहूर शांत मनी

आज का उठले?

का आज भावनांना

पंख माझ्या फुटले


जो टाळला मी चेहरा

तो आज पाहिला

भूतकाळ तो गेलेला

पुन्हा मज आठवला


ते दाटले अश्रू

नयनी माझ्या क्षणात

दिनरात जागले मी

फक्त तुझ्या आठवांत


तो काळ गेला पुढे

मनास मी सावरले

तुझ्या परत येण्याने

मन पुन्हा गहिवरले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy