काहूर
काहूर
मनाला लागलिया हाव, करी सुखाची चोरी तो चोर
मन नाही आता स्थिर, विचारांचा काहूर करी घोर
भावांनी भावाच्या शेतीचा, बांधाला लावला तो कोर
गरिबाचा गळा तो करतो, जवळ तो दोर
फाटका खिसा तो हळूच लपवी, हसण्या ते पोरं
मन नाही आता स्थिर, विचारांचा काहूर करी घोर
वाटले आयुष्य आहे, असे किती ते थोर
नाचतो मोकळ्या अंगणी, थुई थुई तो मोर
सावरण्या आयुष्यासाठी, मागवला, दुःखाचा ते खोरं
मन नाही आता स्थिर, विचारांचा काहूर करी घोर
जगणं झालं मुश्किल, स्थिती झाली धोर
सारं ते आवडे लोकांना, असे जे की गोर
नाचवतो ऐसा बाज, जसे मिरवीत तोर
मन नाही आता स्थिर, विचारांचा काहूर करी घोर
लावला जिद्दीचा तो, असा काय जोर,
झगडन्या संकटाशी, युक्ती केली थोर
परी शहाणपण नाही ऐसा, अनूभव घाली होरं
मन नाही आता स्थिर, विचारांचा काहूर करी घोर