थॅंक्यू काेराेना
थॅंक्यू काेराेना
कोराेना तू मृत्यूचे मांडले आहेस थैमान;
चूक झाली, झालो होतो मातीशीच बेईमान.
काेराेना तूझ्यामुळेच शांतता पसरलीये सर्वत्र.
भरवले आहेस तू भयंकर अशा मृत्यूचे सत्र.
आमचं कुटुंब खूप दिवसातून आलय एकत्र;
बास कर काेराेना बळी घेऊ नको आता मात्र.
खरंच आभारी आहे तुझा मी कोरोना-
कामात व्यग्र असणार्या बाबाला मिठी मारण्याचा आनंद दिल्याबद्दल.
आईच्या कुशीत शिरल्यानंतरची शांतता दिल्याबद्दल.
बहिणीशी भांडल्यानंतर 'तुझ्यावाचून करमेना' ही फिलिंग दिल्याबद्दल.
मित्रांसोबत च्या जुन्या दिवसांच्या आठवणीला उजाळा दिल्याबद्दल.
सगळे कुटुंब घरीच त्यामुळे एकत्र जेवणाचा घाट घातल्याबद्दल.
शहरातही प्रदूषणविरहित हवा मिळवून दिल्याबद्दल.
आमच्या कृत्रिम जीवनशैली ची जाणीव करून दिल्याबद्दल.
मंदिरातील देवांनाही मोकळा श्वास घेऊ दिल्याबद्दल.
पुढे मृत्यू दिसल्यामुळे दुखावलेल्या मनाची क्षमा मागण्याची हिंमत दिल्याबद्दल.
माणूस सामाजिक प्राणी आहे याची पुन्हा जाणीव करून दिल्याबद्दल.
स्वतःशीच सुसंवाद साधण्यासाठी मोकळा वेळ दिल्याबद्दल.
माणुसकी हाच खरा धर्म आहे हे आम्हाला पुन्हा शिकवल्याबद्दल...
खरंच थँक्यू कोराेना.
