STORYMIRROR

Rama Khatavkar

Classics

3  

Rama Khatavkar

Classics

एक नवा 'आज'

एक नवा 'आज'

1 min
264

निवांत गारवा

रातकिडे गात

काळीभोर रात 

पुढे जाई


रात सरकली

तारे पुसटले

दमले भागले 

प्रवासाने


अथांग आकाशी

निळाई निळ्याची

प्रभा सावळ्याची

जिथे तिथे


दिशाही आतुर

न्याहाळत नभा

रवीआधी प्रभा

केशराची


डोंगरामागून

आला रविराज

एक नवा 'आज'

उगवला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics