अनोखी योद्धे संशोधक
अनोखी योद्धे संशोधक
अभ्यास करावा लागतो रात्रंदिवस
वाचावी लागतात पुस्तकं ढिगभर
फिके पडती त्यांच्या परिश्रमापुढे कित्येक नवस
कष्टामध्ये सातत्य ठेवावे लागते वर्षभर
विज्ञान हेच त्यांचं शास्त्र
संशोधनातच खरा त्यांचा आनंद
त्यांनीच दिले विश्वाला प्रगतीचे शस्त्र
नसते केले संशोधन तर प्रगती झाली असती मंद
जातात सामोरे प्रत्येक परिस्थितीला
झुंज देतात प्रत्येक संकटांशी
संशोधकच दिलासा देतात साऱ्या विश्वाला
आले अपयश तर जिद्द बाळगतात उराशी
आजही कोरोनाच्या महामारीमध्ये गरज भासते शास्त्रज्ञांची
आशा वाटते प्रत्येकाला शोध लावतील संशोधक
त्यांच्या संशोधनामुळे चिंता वाटत नाही कशाची
तेच खरे आहेत विषाणूला थांबविण्याच्या उपक्रमाचे निरीक्षक
