Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शुभांगी कोतवाल

Abstract Classics

4  

शुभांगी कोतवाल

Abstract Classics

काहूर

काहूर

1 min
261

निळ्याभोर आकाशात पक्ष्यांचे थवे विहरता ,

सर्वदूर जमीन व शिखरांवर दव पसरले असताना ,

सकाळची कोवळी सूर्यकिरणे चमचमताना ,

प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला दिसताना ,

कोकिळेच्या मंजुळ आवाजाची साथ असताना

का कुणास ठाऊक तिच्या मनात काहुर उठलं होतं !

दारात सडा टाकून नक्षीदार रांगोळी काढताना ,

बागेतील सुंदर रंगीबेरंगी फुले परडीत ठेवताना ,

निशिगंध , शेवंती , मोगऱ्याचा सुगंध पसरता ,

कानावर सुरेल आवाजात गाण्याचे सुर पडता ,

गाय तिच्या वासरासाठी कासावीस होवून हंबरता , 

का कुणास ठाउक तिच्या मनात काहुर उठलं होतं !

सकाळच्या न्याहारीला चविष्ट कांदेपोहे बनवताना ,

कामावर जाणाऱ्या नवऱ्याला निरोप देताना ,

आरशासमोर बसून निटनेटके तयार होताना ,

ताजी हिरवी भाजी निवडताना , 

वर्तमानपत्रात आवडीचा लेख वाचताना , 

का कुणास ठाउक तिच्या मनात काहुर उठलं होतं !

सासू - सासऱ्यांकडून होणाऱ्या कोडकौतुकाने , 

सायंकाळी देवासमोर समई तेवत असताना ,

हाथ जोडून मनोभावे नमस्कार करताना , 

अजुनही माहेरच्या आठवणीने व्याकुळ होताना ,

सायंकाळी नाजुक सुवासित गजरा विकत घेताना ,

का कुणास ठाऊक तिच्या मनात काहुर उठलं होतं !

कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालताना

रुमालावर नक्षीदार वेलबुट्टी भरताना ,

लोकरीचे इवलेशे पायमोजे विणताना ,

पक्षी आपल्या पिलाला भरवत असताना ,

शाळेत जाणाऱ्या मुलांना मनसोक्त बागडताना पाहून

का कुणास ठाउक तिच्या मनात काहुर उठलं होतं !

आज शेजारी बारश्याचा सोहोळा न्याहाळून , 

आईच्या मांडीवर नीजलेल्या तान्ह्या बाळाला पाहून,

थट्टा मस्करीत कुणीतरी केलेला प्रश्न ऐकून , 

आज तिच्या मनात उठलेला ते काहुर , 

मन व्यथित करून गेलं होतं , 

पण अचानक पाठीवर कोणाचा तरी मायेने फिरणारा हात , 

आशा अन दिलासा देवून गेला होता ! 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract