काही माणस
काही माणस
काही माणसं असतात गोड साखरेसारखी
क्षणभराच्या सहवासाने चेहऱ्यावर हास्य फुलविणारी
काही माणसं असतात मिठासारखी
त्यांच्या कमतरतेमुळे जीवनाला अर्थ मिळत नाही
काही माणसे असतात
तेजस्वी सूर्यासारखी
ज्यांच्या फक्त स्मित हास्याने जगण्याची इच्छा होते
पल्लवित बहरलेल्या वृक्षासारखी
काही माणसं असतात अतिशय कोमल मनाची वागण्यातून
मने जिंकून घेतात दुसर्याची
अन् आचरणातून ते उधळण
करतात आनंदाची
काही माणसं भासतात फुलांसारखी निरागस
नाना रंग सुहास पसरवूनी जीवन करती तेजस
काही माणसं वाटतात आपल्याला आपली
त्यांच्याशिवाय पूर्ण नाही होत आयुष्यातील सोबतीची साखळी
काही माणसं असतात
मनात घर करुन राहणारी
जीवाला जीव लावणारी
न काही सांगता मनातलं ओळखून सार काही समजणारी
काही असतात आठवणींना मनापासुन जपणारी
आपल्या हक्काची,
कठीण काळात
भरभक्कम आधार देणारी
काही माणसं असतात
मनाने अतिशय साधीभोळी
दुसर्याचे दुःख पाहताच अश्रू येतात त्यांच्या डोळी
काही माणसं असतात,
करत नाही गाजावाजा आपल्या कार्याचा घेतलेला असतो त्यांनी वसा समाजसेवेचा
काही माणसांचा मोठेपणा
असतो हिमालयाच्या उंचीचा
त्यांच्या साधेपणाला पाहून
अंदाज बांधवा खुजेपणाचा
परंतु कोकणातली माणसं
ही निराळी असतात
कडक कणखर स्वभावाची
फणसासारखी बाहेरून काटेरी
पण आतून गोड गरासारखी. ..
अशी ही काही माणसे नाना स्वभावाची,विचारांची
जाती देऊनी त्या कधी कडू गोड,
अविस्मरणीय आठवणींचा ठेवा
काही देतात दुःखात साथ,
हातात हात उभे खंबीर सदा पाठीशी जपती जीवा
स्मरणात सदा राहती
अशी माणसे लाभली
आभार तुझे देवा 🙏🙏
