STORYMIRROR

Jairam Dhongade

Inspirational

3  

Jairam Dhongade

Inspirational

का?

का?

1 min
229

उगा धावतो का?

फुका कावतो का?


असा देव कोणा,

कधी पावतो का?


जलातील मासा,

गळा गावतो का?


दिले दान मोठे,

पदर मावतो का?


सुरा सोनियाचा,

उरी घाव तो का?


न कामास येई,

तया भाव तो का?


करे काम कोणी,

मनी माव तो का?


नको वाट सोडू,

भली दावतो का?


उभी जिंदगानी,

पटा लावतो का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational