STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Tragedy

2  

शिल्पा म. वाघमारे

Tragedy

का फाटले आभाळ?...

का फाटले आभाळ?...

1 min
597

लहर लहर उफाळते

जेव्हा सागरी मनाच्या

अनंत तरंग नाचती

पटलावर विचारांच्या.. .


गुंतागुंत पेच सारा

मांडलेला भोवती

कळेना सोडवू कसा

मळभ दाटती सभोवती...१


जीवनाची नौका एकटीच

भरकटते तुफानी वाहताना

झेलीत अकर्मिक आरोप

डळमळते भयात साहताना...२


स्वप्न नवे रेखताना

नव्या गुंतता विश्वात

माझ्याच बांधवांनी

कोंडले मज कोषात...३


संस्कार तातमातेचे

ज्ञान गुरुंचे थरथरले

क्षणात विचारांनी माझ्या

थैमान अंतरी घातले...४


मी एक स्वतंत्र आत्मा

सुखशांतीच्या शोधात

गुरफटतो मायाजाळी

का होते मन विचलित..?..५.


उत्तरालाही पडलेत प्रश्न

दिशाहीन भयभीत दिशा

आकाशी आकांत गहिरा

धरेची विरताहे आशा...६


संवेदनाहीन वाहतो वारा

कुणी रुक्षता ही पेरली

काळाच्या विकारी जाळ्यात

सारीच कशी हो ओढली...७


का फाटले आभाळ

सत्य हरवले अंतरीचे

तेजस्वी ज्योती जागृती

साधना लक्ष्य आता टोकाचे...८


अस्तित्व भंगण्या आधी

कृपाकटाक्ष देई हे कृपाळा

विनवित लेकरु पायाशी

पुरे कसोटी आता दयाळा...९


मीच मला गवसू दे

मग कसली खेचाखेची 

जिव्हेसम जगेल खुशाल 

तमा न राहिल बत्तीसांची...१० 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy