STORYMIRROR

Suvarna Patukale

Inspirational

4  

Suvarna Patukale

Inspirational

का निराश होसी आज

का निराश होसी आज

1 min
240

का निराश होसी आज, रात्र असे झाली

सूर्य उद्याची पहाट, रंगवील सारी / ध्रु. /


जाईल हा क्षण मना, ग्रहण हे सुटेल 

वठलेल्या वृक्षा तुज, पालवी फुटेल 

आस हाच मंत्र खरा,अपयशास मारी 

सूर्य उद्याची पहाट रंगवील सारी  /1/


उभी यशाची गिरीशिखरे, मान ताठ करूनी

ध्येय तू ही घे, असे नसानसात भरूनी

अंतरात घुमू दे नाद, छेड तू सतारी 

सूर्य उद्याची पहाट, रंगविल सारी /2/


का राहसी तू उदास, विसर हे आघात 

यातूनच फुलते, जे अंकुरते आत 

झटत रहा दिसतील तुज, सुखद दिशा चारी 

सूर्य उद्याची पहाट, रंगविल सारी /3/


आकाशच हे मुठीत, घेशील तू सारे 

असतील तुज सोबतीस, सूर्य चंद्र तारे 

हरू नकोस झुरू नकोस, घे आता भरारी 

सूर्य उद्याची पहाट, रंगवील सारी /4/.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational