STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

का नाही मिळाले भारतरत्न...

का नाही मिळाले भारतरत्न...

1 min
109

दीड दिवस शिकून शाळा

अण्णाभाऊ साहित्यरत्न झाला,

का नाही मिळाले सांगा

भारतरत्न माझ्या अण्णाला...


जन्मूनी अस्पृश्य जातीत

अठरा विश्व दारिद्र्यात,

नाव कमविले जगात

असा साहित्यकार नाही झाला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला...


हाती तलवार ती लेखणी

मारली डफावर थाप त्यांनी,

गेले रशियास विमानातूनी

अण्णा कळणार कधी या देशाला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला...


शाहिर, लेखक, कामगार नेता

दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता,

मोठा विद्वान, विचारवंत होता

ना होणार, न कोणी असा झाला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला....


जातीवाद, विषमतेला

भांडवलशाही नि अन्यायाला,

अण्णाभाऊनी विरोध केला

लौकिक अण्णांचा जगभर झाला....

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला.,..


अनेक निघाले चित्रपट

साहित्य अभ्यासती विद्यापीठं,

परकीय भाषेत झाले अनुवादित

प्रणाम शतदा त्या लोकशाहीराला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला...


किर्ती अण्णाची आज गाऊ

खरे भारतरत्न हे अण्णाभाऊ,

जन्मशताब्दी वर्षानिमित्त

हवेच भारतरत्न अण्णाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational