STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

का? आडोसे ओलावले...

का? आडोसे ओलावले...

1 min
130

तुला हसतांना जेव्हा पाहिले ,

पाहूनी समाधान मिळाले ,

स्वप्नात तुझ्या डोकावताना,

आठवणीत डोळे मिटले ...

आताच भेटलो आपण ,

दूरावे किती जुने झाले,

विरह जीवघेणा तरी ,

दुःखात सुखाचे गाणे झाले...

क्षितीजावर क्षण ते कोरले,

शब्दाला मी मागे फिरले,

बोचणाऱ्या शब्दांचा घाव ,

मनात बारमाही फुलले ...

आठवांचे क्षण ते तुला,

हसुन टाळतांना पाहिले,

डोळ्यांत कुठे खूपले ,

का? आडोसे ओलावले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract