ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक
आयुष्य वेचले कष्टामाजी
आता तरी जग रे तू स्वतः साठी
पायी चालून पैका वाचिवला
खर्चिला तो पोराच्या शिक्षणापायी
नाय ल्याल नवं कापडं नि वहाण
माझ्या सोन्यासाठी आणला ग भारी तला आय फोन
नको नको म्हणूनी मारिला ग किती जीव
येते मलाच ग माज्या धन्याची ग कीव
आता तरी कधी तरी मनाचा मोर तू नाचव
स्वतः साठी जग नव्यानं थाट संसार
आण ना मला आधी मधी सुगंधी गजरा
गरम भजे अन तिखा पाव वडा
दोघ जाऊ जोडीनं मंदिरी पाया पडा या
तुम्ही जगाला असाच सन्यासावानी
माझी ही झाली फरफट दिनवाणी
पाखरांची भरली आता हो चोच
आले पंखात त्यांच्या हो बळ गेलीती दूर देशी
आता नको वनवास, मस्त जग तू राजी खुषी
