STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

ज्येष्ठ नागरीक दिन

ज्येष्ठ नागरीक दिन

1 min
264

वय जरी वाढलं तरी 

मन तरूण असावे 

स्वतःला झोकून देऊन 

छान आयुष्य जगावे....


पाहिले नसेल आत्तापर्यंत

आता सारे जग पाहावे

सौंदर्याचे खजिने सारे

मनामध्ये साठवावे....


जे जे सारे केले नाहीत

ते ते सारे करून पाहावे

राहून गेलेल्या गोष्टींचे

सार चाखून तरी पाहावे....


कष्ट सारे किती केलेत

ते सारे विसरून जावे

तरूणपणी राहिलेले

नव्याने पुन्हा अनुभवावे....


सार्‍यांना सारे दिलेत

आता स्वतःकडेच पाहावे

स्वार्थाचे हे आहे जग

समजून मनात असावे....


घासातला घास द्यावा....

हे तर सार्‍या जगास ठावे

बसायचा पाट कुणा देऊ नये

हे सत्य मात्र मनी ठसावे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational