Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Raikhelkar

Inspirational

3  

Mahesh Raikhelkar

Inspirational

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

1 min
372


थोर पराक्रमी, ध्येयधोरणी !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

जिजाऊचा बाळ, शहाजीचा लाल !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

भवानी देई तलवार, शत्रूवर करी वार !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

स्त्रियांचा आदर, कडेलोट जर आली तक्रार !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

अफजलखानाचे फाडे पोट, शाहिस्तेखानाची तोडी बोटं !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

स्वराज्याचे बांधी तोरण, रयतॆच्या हिताचे राबवी धोरण !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

गोब्राह्मण प्रतिपालक, मावळ्यांचा नायक !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

श्रीमानयोगी, ज्ञानयोगी !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

तानाजी, बाजीसारखे घडवी सरदार !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

साक्षात शिव अवतार, प्रजेच्या मनात आदर !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

कुलदीपक, खरा लोकनायक !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

राजाधिराज, ओरंगजेबाचॆ झुकवे शीष !

जय शिवाजी ! जय शिवाजी!!

हिंदवी स्वराज्य स्थापक, मुगलांना बसवे धाक !

जय शिवाजी ! जय शिवाजी!!

छावाचा पिता, जाणता राजा !

जय शिवाजी ! जय शिवाजी !!

आमचे दैवत, होऊ नतमस्तक !

जय शिवाजी ! जय शिवाजी!!

जय शिवाजी ! जय शिवाजी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational