STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

॥ जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ॥

॥ जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ॥

1 min
375

मन होत आहे सैरभैर, आवर नाही त्याला  

दरवर्षी देवा वारीबरोबर येतो दर्शनाला 

या वर्षी व्यवहार झाले ठप्प 

कटीवर हात ठेऊन उभा का तु गप्प 

टाळ चिपळ्यांचा नाद येतो ना तुझ्या कानी 

विठ्ठल विठ्ठल म्हणूनी रंगून जाते वाणी 

चंदनाचा लेप लावू दे तुझ्या अंगकांती 

तुळशीमाळ घालू दे मला ही वेडी वैजयंती 

नाही वारि, नाही वारकरी, नाही भक्त भोळा 

व्याकूळ झाला जीव हा, नाही रिंगण सोहळा 

देवा तुझ्या विटेखाली चिरडून टाक हा कोरोनाचा किडा 

टळून जाउन दे सगळ्या जगाची इडापिडा 

प्रेमाने पंचखाद्य नैवेद्य, उघडा तुमची झोळी 

सुख समाधानाने खाउ दे तुपसाखर पोळी ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational