STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4  

UMA PATIL

Inspirational

जय देवी, जय देवी (आरती)

जय देवी, जय देवी (आरती)

1 min
27.9K



जय देवी जय देवी, जय अंबाबाई

आम्ही लेकरे तुझी, तू आमची आई.....॥धृ॥



भक्त तुझे पामर, करतो तुझी भक्ती

तू दुर्गाशक्ती, द्यावी तू आम्हां शक्ती.....॥१॥



तारूनी संकटातून, सर्वांना ठेव सुखी

अंबाबाईचे नाव, नित्य येतसे मुखी.....॥२॥



मिळू दे आशीर्वाद, होऊ दे भाग्यवान

नित्य गातो आम्ही, आई तुझे गुणगान.....॥३॥



स्वीकार अंबाबाई, तू आमची प्रार्थना

सफल होऊ दे, साधकांची साधना.....॥४॥



लेकरांचे अपराध, घाल तू पोटी

'उमा' भरते, खणा-नारळाने ओटी.....॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational