जुनीशीच पायवाट...
जुनीशीच पायवाट...
जुनीशीच पायवाट
ओळखीची असणारी
सहवास कधीचा तो
हळूवार जपणारी
क्षण एकांताचे किती
तिच्या साक्षीने भोगले
पाश नात्याचे ही साक्ष
तिला ठेवून तोडले
सडा प्राजक्ताचा असे
तिजवर पहुडला
शेवटचे गेलास तेव्हा
अश्रू त्यानेच पुसला
धैर्य आताशा होतसे
मला तिथून जाण्याचे
पायवाट विचारते
रोज कारण येण्याचे

