STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

जरा ऐक ना

जरा ऐक ना

1 min
479


जरा ऐक ना .....

काही सांगायचे आहे तुला....

तुला भेटताना होणारी....

ह्रुदयाची धडधड

ऐकवायची आहे तुला...


तुला पाहताना हळूच ..

झुकणारी माझी नजर

दाखवायची आहे तुला ....


तुझ्या बरोबर ....

चालताना हां रस्ता कधी संपू नये ....

हे सांगायचे आहे तुला ...


तु सोबत असताना .....

सुर्याची किरणे देखील गार वाटतात

हे सांगायचे आहे तुला.....


तू नसताना ...

तुझाच चेहरा नजरे मधे असतो माझ्या...

हे सांगायचे आहे तुला ....


तुझ्या बरोबर बोलताना....

होणारी शब्दांची धडपड....

ऐकवायची आहे तुला ....


तुझ्याशिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा.....

हे सांगायचे आहे तुला

तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना...

सांगायच्या आहेत तुला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance