जोडी-दार....
जोडी-दार....
प्रेम हवं तुच साथ ही हवी...
सवय झाली मला तुझ्या सहवासाची...
देवाने बांधल्या आपल्या सात जन्माच्या गाठी...
अशाच नाही जुळल्या आपल्या रेशीम गाठी....
अनोळखीतुन ओळख झाली आपली...
पवित्र बंधनात आता आपण अडकत गेलो...
तुझ्या हास्यात एक चमक आहे...
जगण्यात तुझ्या भरघोस आनंद आहे..
डोळ्यात उंच भरारी घेण्याची जिद्द आहे...
बोलण्यात तुझ्या मायेचा सहवास आहे...
खुप आहे सांगण्या सारखे पण शब्द कमी पडत आहे....
एवढेच सांगु इच्छिते तुला...
माझ्या वर प्रेम असंच राहू दे तुझ साथ ही अशीच हवी...
उगाच नाही माझे मन सांगत...
तु योग्य निवड केलीस....

