ज्ञानरूपी वसा...
ज्ञानरूपी वसा...
चांगल्या वाईटाची
जाण करून देतो तो
आयुष्यात पुढं जाण्यास
प्रोत्साहीत करतो तो
भेद भाव न करता
सर्वांना ज्ञानाचे दान करतो तो
योग्य मार्ग दाखवतो तो
भरभरून देतो तो
तो आई,वडिल,शिक्षक,
आपले मित्र आप्तेष्ट तर
कधी अनुभवांच्या
शिदोरीतून भेटतो तो
तोच देतो खरा
ज्ञानरूपी वसा
गुरू म्हणतात
तुम्ही आहे त्या क्षेत्रात
मेहनत घेवुन कसा
मग आयुष्यभर यशाची
सुमधूर फळे चाखत बसा
