STORYMIRROR

Saroj Gajare

Inspirational

3  

Saroj Gajare

Inspirational

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले

1 min
1.0K


क्रांतीज्योती सावित्री माय

विसरू कशी तुझी सय

एकही दिस जात नाय

तुझी सय काळजात हाय।।


स्रियांच्या उद्धारा , झिजलीस तू माय

अंधारल्या वस्तीत , लावलास तू दीप

स्रियांना देण्या रूप , कोरलेस तू शिल्प

विधवा अनाथांची, झालीस तू माय।।


तुझ्यामुळे आयुष्याला अर्थ लाभला

स्त्री शिक्षणामुळे कायापालट झाला

तुझ्या दगड गोट्यांचा अंगार फुलला

क्रांतिदिप तुझा पेटताच राहिला।।


तुझा प्रवास खडतर, वास्तवाचा वणवा

महिलांसाठी ठरला, ज्ञानदीप पेटता

या नभाने द्यावे आम्हा ढालीचे दान

झिजून मरावे क्रांतीज्योतिसमान।।


भगिनींना जागवीन,संघटित करीन

ज्ञानज्योत लावीन ,हेच तुला नमन ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational