ज्ञानाचे स्रोत पुस्तक
ज्ञानाचे स्रोत पुस्तक
मिळे पुस्तकातून खरा
ज्ञानाचा स्त्रोत झरा
समुद्राप्रमाणे वाहतो
मानवाचा मित्र खरा ||
पुस्तक वाचल्यानेच
मिळे दिशा जीवनाला
मार्गदर्शक, मनोरंजक
असतात नेहमी मानवाला ||
प्रेरणेचे प्रचंड भांडार
लेखकाची कल्पनाशक्ती
ज्ञानाचा प्रकाश पसरती
पुस्तकातच असे भक्ती ||
वाचनमुळेच मानवाचा
सारा दृष्टिकोन बदलतो
जीवनातील समस्येवर मात
करण्यास मार्ग सापडतो ||
गोडी लावूनी वाचनाची
पुस्तके आहेत महत्त्वाची
ज्ञानामृत समजून पिण्याची
त्यातून मिळणाऱ्या सत्वाची ||
पुस्तक सांगतात खूप गोष्टी
आजची ,कालची, युगायुगाची
विश्वासाची ,दुःखाची ,प्रेमाची
आठवण आज पुस्तक दिनाची ||
