STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

4  

VINAYAK PATIL

Abstract Others

जणण्याचे सामर्थ्य

जणण्याचे सामर्थ्य

1 min
190

उसळणाऱ्या लाटांचे तुषार झेलीत अंगावर

फेसाळलेले दु:ख विरण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे ||१||


तो कालचा प्रवासी थकून विसावलेला

मैलोन् मैल चालून संतोषात मौज आहे

जगण्यात मौज आहे ||२||


जन्मली रक्ताची नाती, जमवली अनेक ती

फुटल्या अनेक वाटा, सदिच्छात मौज आहे

जगण्यात मौज आहे ||३||


एकमेका सोबतीस सावली, सावली तिमाराधीन झाली

अंधार सोबतीस, एकांतात मौज आहे

जगण्यात मौज आहे || ४||


विसाव्यातील पाखरे, गगन-भरारी झाली

नजरेआड होईतो, पाहण्यात मौज आहे×

जगण्यात मौज आहे ||५||


लिहुन झाले इतुके, वाचण्यात अर्थ काही ?

माफी असावी मजला, लिहिले काहीबाही

लिहिण्यात शोध आहे ||६|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract