STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Romance Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Romance Inspirational Others

जन्माची गाठ

जन्माची गाठ

1 min
319

एकमेका देऊ साथ 

जन्मजन्मांतरी गाठ,

नाते सुंदर विश्वात 

देई प्रसिद्धीस वाट..!!१!! 


रंग गहिऱ्या प्रेमाचे 

उमलले बोहल्यात,  

समजून एकमेका 

साथ देई आयुष्यात..!!२!!


आशीर्वाद मिळे थोर 

स्फूर्ती येई विचारात, 

धोरणांची रूपरेषा 

कार्यान्वित समाजात..!!३!!


कला कौशल्यांची जोड 

सखा सोबती जवळ, 

कर्म कांड सहचर 

मिळे चैतन्याचे बळ..!!४!! 


जोड अशीच फुलावी 

धर्म-कर्म पुण्य व्हावे, 

लाभो उदंड आयुष्य 

तुम्ही सौख्याने नांदावे..!!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance