STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

जन्म - मृत्यू

जन्म - मृत्यू

1 min
286

जन्म - मृत्यू मधले अंतर

आयुष्य म्हणजे त्याचे जीवन

जगणे आहे नितांत सुंदर

दोन घडीचा डाव आपुला


बायको पोर ,गुरंढोरं , सगेसोयरे

मायावी जग सारे नित्य निरंतर 

जणू सुख - दुःखाचा लपंडाव

बालपण , तारुण्य नी वृद्धापकाळ

 

भोगण्याची भोग सारे

तुझे माझे काय निराळे ?

तू करतो पोटासाठी अन

मीही काही वेगळा नाही


भूक हीच शाप अन धर्मही

तीच समस्याची जननी

नाहीच लागली भूक तर ?

नाहीच हलवणार हातपाय कुणीही


पशु- पक्षी, फुले फळे, वृक्षवेली

सगळ्यांनाच उदरभरण नी वंशवृद्धी

नियंतांन सर्वकाही ठरवून दिलेलं

जन्म - मरण ,येणे तसेच जाणेही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy