Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Shinde

Inspirational

4.0  

Anil Shinde

Inspirational

जन्म क्रांतिसूर्याचा

जन्म क्रांतिसूर्याचा

1 min
279


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

भूतली दाटला निबिड अंधकार

कर्मठानी समाज व्यवस्थेवर घातला घाला,

भिडण्या त्या भयाण काळोखा

क्रांतिसूर्य जोतिबानं जन्म घेतला! ||१||


क्रांतिसूर्यानं उघड्या डोळ्यांनी हेरलं

अनिष्ठ रूढी, प्रथा, अस्पृश्यता, स्त्री दास्याला,

'अखंड'तूनी केला प्रहार विषमतेवरी

उद्गारलं पेटवूनी मानवतेच्या ज्योतीला! ||२||


होण्या जाणीव स्त्रीला अन्यायाची

असावी लागेल ती साक्षर,सज्ञान,

पेललं शिवधनुष्य स्त्रीशिक्षणाचं

सावित्रीच्या साथीन केलं दूर तिचं अज्ञान! || ३||


सत्यशोधक धर्म स्थापूनी दिली

तिलांजली जातीव्यवस्थेला

'शेतकऱ्याच्या आसुडा'तून फोडली

वाचा कृषिवलाच्या दयनीयतेला! ||४||


स्त्री शिक्षणाचं घट्ट रुजवूनी झाड

विधवाविवाह,पुनर्विवाहास दिलं बळ,

'गुलामगिरी'तून बालविवाह,केशवपन,अस्पृश्यता

सती प्रथेचं उन्मळून फेकलं मूळ! ||५||


पटले बाबासाहेबांना विचार थोर

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबांच्या समाजसुधारणेचं,

झालं मिलन क्रांतिसूर्य-प्रज्ञासूर्याचं

गुरू मानूनी केलं आचरणं जोतिबांच्या तत्वांचं! ||६||


म्हणतो समाज सारा या कर्मयोग्याला

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले,

होते कर्ते समाजसुधारक पहिले

या तेजप्रकाश नररत्नाला शब्द पुष्पांजली वाहिले! ||७||

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational