जीवनसागर
जीवनसागर
आयुष्यात येते ब-याचदा दोन निर्णयांची कात्री,
काय चूक काय बरोबर काहीच नसते खात्री!
नशीबावर हवाला ठेवून गेलो जरी पुढे,
काय वाढलंय भविष्यात,मन आतल्याआत कुढे!
आज जरी सुटलो तरी कधीतरी जाणार भरडले,
आयुष्याच्या जात्यात आपले जीवन दाणे खरडले!
आला दिवस साजरा करून आनंदाने जगू,
स्थिरचित्त-धैर्याने या जीवन सागरात तगू!
