STORYMIRROR

Suresh Kulkarni

Classics

4  

Suresh Kulkarni

Classics

जीवनपथ

जीवनपथ

1 min
407

जीवनपथ हा चालता

बोचती कधी काटे

पायी खडा टोचतो कधी 

कधी मखमली जाजम वाटे


वाट कधी शुष्क कोरडी

कधी चिखल निसरडा भेटे

वाट सरळ ती असे कधी 

वळणे कधी वेडीवाकुडी 

चढ कधी कधी उतार

वाटे कधी ती छान फाकडी


साथ मिळे प्रेमळ कधी

कधी सहचर मिळती उफराटे


कधी छान आसमंत

हवा सुगंधित मंद मंद

कधी छळी तो उग्र वास 

धरुनी जीव मुठीत बंद 


कुणा न ठाऊक अंतर किती ते

किती कापले किती राहिले

जायचे कुठे भ्रमण सदाचे

फिरत राही जीव फुका


सतत संभ्रम कधी मनात

कधी संथ संयत 

तर फरफट कधी


प्रवास असा हा जीवनाचा 

क्षणोक्षणी स्थिती

बदलत जाई !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics