STORYMIRROR

santosh selukar

Abstract

3  

santosh selukar

Abstract

जीवनघाट

जीवनघाट

1 min
122

कष्टावरती निष्ठा आहे,हवा कशाला थाट

वा-यासंगे या सहज चढावा जीवन घाट ||धृ||


अलगद जाते निघून ती पायाखालची वाळू

तरी धरावा धीर माणसा,टिपूस नको गाळू

कवेत घ्यावे त्या दर्याला भेदूनिया लाट ||१||


हजारवेळा उठलो पेटून,कुठे बदलले काय

नकोनको ते घडत रहाते,निमूट पेलत जाय

शांत राहूनी,दु:ख साहावे सोडू नको वाट ||२||


आपुल्या हाती काही नाही,बोल तेवढे गोड

-हदयामध्ये प्रेम ठेऊनी,जपत रहावी ओढ  

फुले असो वा असोत काटे प्रारब्धाचे ताट||३||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract