STORYMIRROR

santosh selukar

Others

3  

santosh selukar

Others

माझी भाषा

माझी भाषा

1 min
176

मराठी असे आमुची भाषा मला तिचा अभिमान..

तिच्या वैभवाचे तेज दिव्य हे हवे कशाला प्रमाण


प्रथम राजमान्यता ही तिला लाभली छत्रपतींची 

देऊनी अभय जाहली प्रिय भाषा पेशवे श्रीमंतांची 

व्यवहाराचा राजकोष जणू शब्द सोन्याची खाण


लिळाचरित्री म्हाईमभटाची उजळते ही प्रतिभा 

आद्यकवीला हीच खुणावी शब्दवैभवाची प्रभा 

कित्येक ग्रंथ आमुचे देत राहती जगावया आत्मभान..


Rate this content
Log in