बहरुन आज झाडे
बहरुन आज झाडे


बहरून आज झाडे, फुला फुलांचे सडे सडे
रंग सांडले डोंगरमाथी, सजून आले कडेच कडे
वळणावरचा रस्ता थोडा वळून पाहे जराजरासाराा
रानफुलांच्याटी मधुनी भुजंग दिसे खराखरासा
मन मातीचे हिरव्या रानी बुजून गेले तडचतडे
रंग सांडले डोंगरमाथी ,सजून आले कडेचकडे
अखंड पडते उंचावरूनी शुभ्र फुलांची धार
पाण्यावरती स्वार होऊन वीज नाचते फार
दुःख कुणाचे पाण्यामधुनी वाहून गेले रडेचरडे
रंग सांडले डोंगरमाथी सजून आले कडेच कडे
कुणा न माहीत काय होतसे दूरदूरच्या रानात
ऊन कोवळे हसून बोलते झाडवेलीच्या पानात
जीवन आपले असेच फुलते,शिकवून जाई धडेचधडे
रंग सांडले डोंगर माथी,सजून आले कडेचकडे
बहरून आज झाडे ,फुलाफुलांचे सडेचसडे
रंग सांडले डोंगर माथी, सजून आले कडेच कडे