STORYMIRROR

santosh selukar

Romance

3  

santosh selukar

Romance

गझल 1

गझल 1

1 min
156

गझल 

कधी थेट येते मला फूल देते

मनाला हळूवार चाहूल देते


कळावे कसे या किनारी नदीला

जरा भेटली की कशी भूल देते


जगी शोधले मी मनी सार आता

कळी पाखराला सुखी झूल देते


कधी भासती, वांझ रेषा नभीया

ढगाच्याच पोटी कधी मूल देते


फसावे सदाही उगी या गळाला

कितीदा नव्याने जगी हूल देते


गझल 2

असेल मी कुठे जरी असेल तर तुझाच मी 

फुलात राहुनी हसेल ही असा बिजात मी 

दिवा बनून वात ही जळे कशी घरोघरी

प्रकाश देत चाललो सखे तसा तमात मी 

कशास सैर भैर तू भिऊ नको वादळास 

ढगाळ त्या नभात सावरेल की विजात मी

झरा कसा अखंड चालतो पुढे नदीतला 

तसाच येत भेटतो तुला कधी वहात मी 

तुझाच भास देत राहती वनातली फुले

बहार सावलीस देत राहतो उन्हात मी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance