महिला दिन
महिला दिन
समजून कसा सांगू मुली
माझाच धीर आता खचावयास आला
बेगडी दुनियेत माणसांचा
पायाच खरे आता रचावयास आला
विश्वास शब्द खोटा वचनांस
फार तोटा कहर माजला स्वार्थाचा
देऊन उभारी युद्धास सिद्ध केले
तो ग्रंथही आता वाचावयास आला
ज्यांनीच होता पेलला भार सारा
जगातल्या सन्मार्ग सन्मतीचा
युगांचा वाहता सज्जनांचा
तो प्रवाह आता साचावयास आला
वेशीवर टांगलीत लक्तरे मुली
तुझ्या इज्जतीचे कसे धिंडवडे
चांगल्या कायद्यांचे राज्य व्हावे
विचार आता पचावयास आला
हाती शस्त्र घेऊनी पेटूनी उठावे
व्यवस्थेस सुरुंग लावण्याचा
तो मार्ग पटला कधीच नव्हता
मज आता रुचावयास आला
