जीवनाचे रंग
जीवनाचे रंग
लाभे आम्हा पामरांना
जीवन असे सुंदर
फुलवूया आनंदाने
जगणे करू सुंदर ||१||
रंग भरले जीवनी
खोलवर अंतरंगी
अमूल्य असे जीवन
बहुत रंगीबेरंगी ||२||
जीवनाचे सारे सार
असती या रंगांमध्ये
जरी रंग हरविला
काही नसे आयुष्यामध्ये ||३||
जीवनाचे अनेक रंग
बघितले या आयुष्यातून
असे हे हसतेखेळते जीवन
दिसते वेगवेगळ्या रंगातून ||४||
