Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Shinde

Inspirational

4  

Vanita Shinde

Inspirational

जीवनाचा उद्धार

जीवनाचा उद्धार

1 min
486


स्वातंत्र्याचा अर्थ कधी

नसतो फक्त स्वैराचार

माणुसकीला जपणारे

असावे आपले सर्व आचार...


मानवतेच्या तत्त्वाखाली

जुळावी नाती जिव्हाळ्याची

गुंफुन विश्वासाचा धागा

लाज राखावी स्वातंत्र्याची...


अरेरावी अन् पोकळ आव

हुकूमशाही कुरघोडी डाव

भलत्याच वेड्या हट्टाचा

नको कधी मनात दुर्भाव...


उच्च-नीच, गरीब-श्रीमंत

नको जात-धर्म भेदभाव

ना सान-थोर वा नर-नारी

समानतेचा असावा स्वभाव...


बळजबरी अन् क्रुरतेने

नको कुणावर अत्याचार

स्वकर्माचा न हो कुणा त्रास

हाच मनी असावा विचार...


स्वातंत्र्याच्या नावे नुसत्या

नकोत कत्तल, दंगली

सर्व स्वातंत्र्यांना समजून

घडवुया संस्कृती चांगली...


दुजाभावाने हवा मनात

कशाला भावनांचा बाजार

स्वातंत्र्याचा वसा घेऊनी

करुया जीवनाचा उद्धार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational