STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Fantasy Inspirational

3  

Gaurav Daware

Drama Fantasy Inspirational

जीवनाचा अलंकार...

जीवनाचा अलंकार...

1 min
208

जगाची रीत असतें थोडी बेकार

इथे कोणी दृढ तर कोणी आहे लाचार 

करत विजयाचे असंख्य वार

शेवटी पैशापुढे सर्व मानतात हार


पैसा सोबती असतो दिवसांचा चार

पण त्याची किम्मत जणू जीवन हजार

सगळे त्याच्यापुढे असतात लाचार

जणू पैसाच आहे जीवनाचा आधार


मातीच हे शरीर अन त्यावर मातीचे वार

शेवटी स्मशानात नेईल फक्त माणसं चार

जीवन आहे छोटस कशाला खातोस रे मार

पैसा सोड माणसं कमव जुळवून मनाचे तार


संपत्ती असते जास्त तेव्हा समाधान नसतं फार

समाधान आहे संपत्ती जणू देवाचेच उपकार

थांब जरा मारू नको स्वतःच्या बुद्धीला धार

तू आहे खरा मानव नाही पृथ्वीला भार


आतापर्यंतची संपत्ती तुझा खरा आहे आधार

यात कुटुंबाच भागेल जीवन आणि तुझंही फार

थांब थोडा धीर धर आणि मान देवाचे उपकार

मन आणि माणसं दोन्ही जुळव बनून जीवनाचा अलंकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama