STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

जीवन

जीवन

1 min
259

आजूबाजूची सारी माणसं तुला

दोष देत असतील, आणि

तरीही तू हताश होऊन बसू नकोस

अविश्वास तुझ्यावर दाखवतील लोक

तरीही तू तेव्हा खचू नकोस..

स्तुती करणारेच निंदा करतील

त्यावेळेस, अजिबात हतबल होऊ नकोस

तुझ्यावर खोट्यानाट्या गोष्टी बोलल्या जात असतील

तरीही तू घाबरून जाऊ नकोस..

सगळं जग तुझा द्वेष करतंय

तरीही स्वतःवर प्रेम करायला तू विसरू नकोस

लक्षात ठेव, ही वेळ ही बदलेल

आणि म्हणून तुझ्यातील धैर्य तू सोडू नकोस

माफ जगाने नाही केलं तरी

स्वतःला माफ करायला तू विसरू नकोस

तुझ्या प्रयत्नांवर हसतील कैक

त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला विसरू नकोस

यातनेतही चेहऱ्यावरचे हसू ठेवायला कधीही लाजू नकोस

आणि हे माणसा

जीवन संपवायचा विचार मनामध्ये कधीच करू नकोस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract