जीवन
जीवन
तूझे नी माझे जगणे रिक्त झाले
सूर ओवलेले ते गाणे मुक्त झाले
एकेक श्वासांचे बंध हलके हलके
वीण सूटूनी ते आस फक्त झाले
कसे हे जळावे शरीर आहे अधर्मी
लाकडी ढिगांचे भाव भक्त झाले
कुणाच्या संगमावर लिहीलेले अभंग
आज कुणाच्याही मुखी उक्त झाले
काल ठोकेलेल्या त्वेशयुक्त आरोळ्यांचे
ठेकेदार कसे सारेच अव्यक्त झाले
प्रसवली कुणा ईथे नव्याने अफवा ही
हद्दपार जे जे ते अनभिषिक्त झाले
कुणा का न दिसावे नवउदयाचे ठसे हे
अंध राजाचे सेवेकरी अतीरिक्त झाले
पडसाद येई आता भयकाल रणांगणाचे
सैन्य जे पखाली सारेच अपंक्त झाले
