STORYMIRROR

Dr.Riddhi Jadhav

Inspirational

3  

Dr.Riddhi Jadhav

Inspirational

जीवन सुंदर आहे...

जीवन सुंदर आहे...

1 min
294

जीवन सुंदर आहे ..? 

हे मानवा, मिळे तुला अनुभवयास पहाटेचे मनमोहक सोनेरी आभाळ;?

विचार एका आंधळ्याला, कधी अनुभवली का आयुष्यात त्याने ही सकाळ???

पक्ष्यांची किलबिल आणि वीणेचा ध्वनी कर्णांना सुखावून जाई;?

अशी ही केविलवाणी शांतता एका बधिराचे मन दुखावून जाई!

दिले तुला निरोगी शरीर धडधाकट, तरी कामाचा येतो तुला खूपच वीट;?️

विचार त्या अपंगाला, कधी कुबड्यांशिवाय स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे का तो नीट??

जीवाला जीव देणारी माणसे तुला भेटली, मग आत्महत्या करून कशाला सोडतोस त्यांची ही अमूल्य साथ??‍?‍?‍?

रस्त्याकडेच्या, शरीरात कृमी झालेल्या त्या भिकाऱ्याला विचार, कसा वेडेपणाने केला त्याच्या आयुष्यावर घात!!?

त्या कनवाळू देवाने, तुझ्यावर इतके प्रेम बहाल केले, तरी तुझ्या नेत्रांत उभ्या का अश्रुधारा???

"जीवन सुंदर आहे", तू निःस्वार्थीपणे जगून तर बघ, मग तुझ्या सुखज्योतीने उजळून जाईल हा आसमंत सारा...✨?

तुझ्या सुखज्योतीने उजळून जाईल हा आसमंत सारा!!!??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational