जीवन सार्थकी लागले
जीवन सार्थकी लागले
पहिल्या मधु रात्रीचे, धुंद क्षण ते मिठीतले,
बंद मनाच्या कोंदणात, प्रेम आठवणीतले....!
निरोप येता तुजसाठी, सीमेवर हजर रहायचा,
थरारले काळीज, कसाआता विरह सहायचा...?
"फल मिलनाचे आपल्या, मातृभूमीस कर अर्पण!"
बोल तुझे हृदयी साठवत, केले सर्वस्वाचे समर्पण!
सुकली गजऱ्याची फुले, गेले काजळ ही वहात,
पुसलेल्या कुंकवाचा दाह, विरला प्रीत निशाणी पहात!
कुशीत उजवल्या कोंबाचे, रणांगणात शौर्य गाजले,
छातीवरचे पदक पाहून, जीवन सार्थकी लागले!

