STORYMIRROR

Raghu Deshpande

Inspirational

3  

Raghu Deshpande

Inspirational

जीवन पद्धती....!!

जीवन पद्धती....!!

1 min
87

साधे सोपे जीवन माझे

किमान माझ्या गरजा

किती कमावले किती राखले

मी न मारल्या बेरजा....! 


झाले गेले विसरून गेलो

मनी न ठेवली अढी

प्रेम राखले, प्रेम वाटले

प्रेमरंगाची गुढी....!


व्यवहाराच्या बाजारात

कमी अधिक होते जाते

घासाघीस कुठे करता

कोण काय सोबत नेते....?


अनेक आले आणिक गेले

कोण ठेवितो ध्यानी?

जगरहाटी असे बाबा

जीवन लाविजे कल्याणी...! 


दोन दिसाची रंगत संगत

काही न आपुल्या हाती

आडवे तिडवे बोलून तुम्ही

नका तोडू हो नाती....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational