STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
161

  आयुष्याच्या ओंजळीत

   सुख-दु:खाची फुले,

  क्षणिक सारेच मेहमान

   उत्साह,नैराश्य मनी उमले..


  जरी उमलली कळी वेदनेची

  उत्साहाचा सुगंध फुलवू,

   नैराश्याच्या क्षणांना मग

   आशेची किनार लावू..


   क्षण येतात,क्षण जातात

   वस्ती न कायम कुणाची,

   अंतरीची हाक ऐकूनी मग

   साक्ष हसरी खरी मनाची..


   येता प्रसंगाची कडवटता

    नको पथ मनी खचण्याचा,

    हिंमत धर पळभर बदलेल

    मिळूनी मार्ग यशाचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational