STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Romance

जीव माझा गुंतला

जीव माझा गुंतला

1 min
311

आवरू या चंचल मनाला की

वा-यावर भिरभिरणा-या कुंतला |

प्रेमात तुझ्या पडताच सखे कसा

तुझ्यामध्ये जीव माझा गुंतला | |१| |


तुला न कळले मला न कळले 

प्रीतीचे आपुल्या हे जुळले धागे |

सखे धावते मन माझे हे वेडे जिथे

जातेस तु जाई तुझ्याच मागे | |२| |


भान नाही मला जगाचे हरवून 

मी मलाच बसले नाही कळले |

क्षणार्धात विसरून बंधन सख्या 

फक्त तुझ्यासाठी मागे वळले | |३| | 


सांगू कशी कळेना भास होत 

आहे तु जवळ असल्याचा |

नाद लागला तुझा खुळा सत्य

दाखवी पुरावा तू नसल्याचा |‌ |४| |


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract