STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract Drama

3  

Prashant Shinde

Abstract Drama

झोप..कवीची..!

झोप..कवीची..!

1 min
14K


झोप लागली कवीला बाबा

आज भाग्याचा दिन मी पाहिला

बारा वाजताच कवी कसा झोपतो

याचा दृष्टांत मज झाला...


लेखणी झिजवता झिजवता

स्वप्न उरासी कवी एक जपतो

माझ्या कवितेला वाचक मिळावा

याचीच करुणा तो भाकतो...


रात्र रात्र जागून तो काढतो

अनभिज्ञ स्वप्नामागे धावतो

शब्दांच्या पलीकडचे सदा पाहतो

आणि कागदावरी ते लिहितो...


वाटते त्यालाही कोणीतरी

स्वप्न त्याचेच पुन्हा पहावे

पाहता पाहता आनंदित व्हावे

आणि कवी होऊनी जावे..


आज घडलेच वेगळे

कवीचं वाचक झाला अन्

पटकन निद्रेत सुखावला

बरे वाटले कवी स्वप्नी वाचक झाला...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract