STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

झंझावात

झंझावात

1 min
248

छत्रपती शिवराय रयतेचं

 खरंखुरं धन होतं ;

स्वराज्याची साद घालणारं

 रयतेचे मन होतं .

 

रयत हिताकरिता शिवरायांनी 

दिलं जीवनाचं दातृत्व ;

मावळ्यांप्रती जीवापाड प्रेम 

सलोखा आणि बंधुत्व .


रयतेवरील अन्याय-अत्याचार 

नव्हता राजेंना मान्य ;

"परस्त्रीला मातेसमान"

 मानणारे शिवराय धन्य .


संकटांचा सामना करण्यास 

शिवराय कधीही तयार ;

संकटनिवारण झाल्याविना 

माहीत नव्हती माघार .


 जुनाट वाटा सोडून 

शोधल्या नवीन वाटा ;

गनिमीकाव्याने काढला 

शिवरायांनी शत्रूच्या काटा .


असं हे झंझावात 

आयुष्यात कधीही न थांबणारं ;

 नियतीला झुकवणारं पण 

कोणाही पुढे न नमणारं .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational