STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Abstract

3  

Dattatraygir Gosavi

Abstract

झडत्यांची झडकारी

झडत्यांची झडकारी

1 min
224

पोळ्याच्या सणाला, बैलाच्या मानाला

"हर हर महादेव", झडत्या सणाला।।धृ।।

झड आली ;झड गेली, झडत्या वक्ताला

नंदी डोलं डोलतो, धन्याच्या बोलाला।।१,।।

झडत्याची झडली, झड झडकारी

पडत्यांची पडली, खोटी ललकारी ।।२।।

ज्वारी उडीद मूंग, अस्सल मालाला

गोणपाट ते साजरं, नवं कणगं घराला ।।३।।

कणग्यांची व्यथा, कष्ट करी हाताला

सुख सुपात नि दु:ख, दळते जात्याला।।४।।

सुख ग्राम देवतेला, सुख पारं ओसरीला

सुख काळ्या आईला, नंदी झडत्याला$$$।।५।।

सुखी ठेवं लेकी बाळ्या, माताऱ्या कोताऱ्या

नयतुरणा सदा, पार्वती बाळाला$$$ ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract